महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुन । 12 जूनला राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला इथे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
तर संपूर्ण विदर्भात 15 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे ,आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे . दरम्यान रविवारी अखेर मान्सून राज्यात दाखल झाला आहे.नैऋत्य मान्सूनचं रविवारी महाराष्ट्रात आगमन झालं आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग रविवारी मान्सूनं व्यापाला.