ODI World Cup 2023: 15 ऑक्टोबरला हायव्होल्टेज सामना, 5 शहरांमध्ये खेळणार पाकिस्तान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुन । एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत-पाकिस्तान सामना कधी होईल? या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधला हायव्होल्टेज सामना कुठे पाहायला मिळणार? तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आता उपलब्ध आहेत. भारत-पाकिस्तान कधी आणि कुठे भिडणार हे निश्चित झाले आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. कारण बीसीसीआयने नुकतेच वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सुपूर्द केला आहे, जे सर्व सदस्य देश सहमत झाल्यावर त्याचे अंतिम स्वरूप येईल.


यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या मसुद्यात पाकिस्तानचा संपूर्ण कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तान विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, पाकिस्तान संघ भारतातील 5 शहरांमध्ये आपले लीग सामने खेळणार आहे. या 5 शहरांपैकी एक शहर फक्त अहमदाबाद असेल, जिथे 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी जगातील सर्वात मोठे मैदान नरेंद्र मोदी स्टेडियमपेक्षा चांगले ठिकाण असूच शकत नाही.

मात्र, भारत विरुद्धचा सामना हा या स्पर्धेतील पाकिस्तानचा पहिला सामना असणार नाही. या सामन्याच्या आठवडाभर आधी ते आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. वास्तविक, स्पर्धेच्या प्रारूप वेळापत्रकानुसार, पाकिस्तानचा पहिला सामना हैदराबादमध्ये 6 ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर दुसरा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे. हे दोन्ही सामने विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या संघासोबत होतील.

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, पाकिस्तानचा तिसरा सामना 15 ऑक्टोबर रोजी भारतासोबत होणार आहे. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना 20 ऑक्टोबरला बेंगळुरूच्या मैदानावर होणार आहे. 23 ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. तर 27 ऑक्टोबरला त्याला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. हे दोन्ही सामने चेन्नईत होणार आहेत.

कोलकातामध्ये पाकिस्तान संघाला बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हा सामना 31 ऑक्टोबरला होणार आहे. त्याच वेळी, 5 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडशी सामना होईल. हा सामना दिवस-रात्र ऐवजी दिवसा खेळवला जाईल. यानंतर 12 नोव्हेंबरला पाकिस्तानचा संघ कोलकाता येथे इंग्लंडशी भिडणार आहे. हे सर्व प्रस्तावित वेळापत्रकानुसार आहे, जे पुढील आठवड्यापर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *