Bramha Muhurta : तुमचीही झोप पहाटे 3-4 दरम्यान उघडते ? जाणून घ्या ब्रम्ह मुहूर्ताचं महत्व

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । रोज होणाऱ्या धावपळीमुळे लोकांना रात्री उशीरा झोपून सकळी उशीरा उठण्याची सवय झाली आहे. मात्र काही लोकांना सकाळी लवकर जाग येतोय. काही लोक खूप लवकर उठतात म्हणजेच ते पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान उठतात. त्यानंतर त्यांना झोपच लागत नाही. लवकर जाग येण्यामागे गहन रहस्य दडलेलं असू शकतं. म्हणजे देवतांना तुम्हाला लवकर उठवून घरात पूजा करायची असते.

ब्रम्ह मुहूर्ताची वेळ
ब्रह्म मुहूर्तावर उठणे सगळ्यात उत्तम मानले जाते. याबाबत तुम्ही अनेक लोकांकडून ऐकलेही असेल. मात्र, अनेकांना याबाबत फारशी माहिती नसते. पहाटे 3 ते 4:30 ही वेळ ब्रम्ह मुहूर्ताची असते. याला देवतांच्या उदयाचा काळ असेही म्हणतात.

ब्रम्ह मुहूर्ताचं महत्व
ब्रह्म मुहूर्तावर उठणे शुभ मानले जाते. यावेळी जागरण केल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यावेळी उठणे म्हणजे देवतेला उठवून पूजा करायची असते. यावेळी पूजन केल्याने प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते आणि त्याचे फायदेही दिसून येतात. माणसाच्या इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात. (Sanskruti)

ब्रम्ह मुहूर्ताचे फायदे
ब्रम्ह मुहूर्तावर उठल्याने देव मनातले लवकर ऐकतो. तसेच तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. ब्रह्म मुहूर्ताला हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप शुभ मानले जाते. हा काळ फार शुभ मानला जातो. असे मानले जाते की ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने व्यक्तीला शक्ती, ज्ञान, सौंदर्य आणि बुद्धी प्राप्त होते. ब्रह्म मुहूर्तामध्ये अफनी दिनचर्या सुरू केल्यास सकारात्मक ऊर्जा विकसित होते, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर यावेळी केलेले कोणतेही काम यशस्वी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *