Pune : पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांबाबत मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । पासपोर्टची वाढती मागणी लक्षात घेता पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (पीओपीएसके) ठरावीक काळ दर शनिवारी सुरू राहणार आहेत. सध्या पुण्यात पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये एका महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळत आहे. ‘पीओपीएसके’ने कामाचा एक दिवस वाढवल्याने नागरिकांना लवकर अपॉइंटमेंट उपलब्ध होणार आहेत. पुण्यातील सर्व केंद्रांमध्ये पाच जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पासपोर्ट अपॉइंटमेंटची सविस्तर माहिती https://www.passportindia.gov.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

‘पासपोर्टच्या अर्जाबरोबर नागरिकांनी आधार कार्डाची मूळ प्रत आणावी, आधारकार्डाची रंगीत झेरॉक्स किंवा मूळ प्रत कापून छोट्या आकारातील आधारकार्ड आम्ही पुरावा म्हणून स्वीकारत नाही. कारण आधारकार्डाची सत्यता पडताळण्यासाठी त्यावरील बारकोड तपासणे आवश्यक असते. नागरिक घेऊन येत असलेल्या रंगीत प्रती किंवा अर्ध्या आकारातील आधारकार्डावर बारकोड नसतो. झेरॉक्सवरील बारकोड मशिन स्वीकारत नाही. त्यामुळे नागरिकांनी मूळ आधारकार्ड किंवा ई-आधारकार्ड घेऊन यावे,’ असे आवाहन पासपोर्ट कार्यालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *