Horoscope Today दि. १६ जुन ; आज कष्टाला मागेपुढे पाहू नका ; पहा बारा राशींचं भविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन ।

मेष:-
कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल.

वृषभ:-
दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबत आत्मपरिक्षण करावे. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. काही कामे तुमचा कस पाहतील.

मिथुन:-
सामाजिक कामात सक्रिय राहाल. तुमच्यातील मित्र भावना वाढीस लागेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका. मानसिक ताण जाणवेल.

कर्क:-
तुमच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक आघाडीवर सक्रियता वाढेल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.

सिंह:-
आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. तरूणांशी मैत्री वाढेल. योजनेनुसार कामे पार पडतील.

कन्या:-
जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. हितशत्रूंपासून सावध राहावे. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

तूळ:-
रेस-जुगारातून लाभ संभवतो. तुमच्या मनातील आनंद द्विगुणित होईल. पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. नोकरांना चलाखीने सांभाळावे लागेल.

वृश्चिक:-
जोखीम सावधगिरीने उचलावी. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराविषयीच्या प्रेम सौख्याला बहार येईल. आपले मत व्यवस्थित पट‍वून द्यावे. भागीदारीतून चांगला नफा मिळवाल.

धनू:-
जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. आर्थिक चढ-उतार संभवतात. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. केलेल्या कामातून आपण समाधानी असाल.

मकर:-
घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रेमप्रकरणाला चांगली दिशा मिळेल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका. इतरांवर फार विसंबून राहू नका. जुगाराची आवड जोपासाल.

कुंभ:-
मनातील शंकेचे निरसन करावे. अघळपघळ बोलणे टाळावे. घरातील टापटि‍पी बाबत दक्ष राहावे. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. नवीन जबाबदारीची जाणीव ठेवाल.

मीन:-
आततायीपणे निर्णय घेऊ नका. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *