महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । जगाच्या पाठीवर एक बेट असे आहे जिथे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सूर्यास्त होत नाही. मुले रात्री दोन वाजताही बाहेर खेळू शकतात. या बेटाचे नाव आहे सोमरॉय. हे बेट नॉर्वेच्या वेस्ट ट्रोम्सोमध्ये आर्क्टिक वर्तुळात उत्तरेकडे आहे. मे ते जुलैच्या अखेरपर्यंत जवळजवळ 70 दिवस याठिकाणी सूर्यास्त होत नाही. आकाशात चोवीस तास सूर्य तळपत असताना दिसतो.
भीषण थंडीनंतर उन्हाळा येतो आणि तिथे सूर्य असा 70 दिवस प्रकाश आणि उष्णतेचे दान देत राहतो. मात्र, त्यापूर्वी तीन महिन्यांची काळोखी रात्रही या बेटाला सहन करावी लागते. हिवाळ्यात सलग तीन महिने याठिकाणी सूर्यदर्शन घडत नाही. दिवस-रात्रीच्या या अनोख्या चक्राचा येथे राहणार्या तीनशे लोकांना सामना करावा लागतो. हे लोक जगातील पहिला ‘टाइम फ्री झोन’ बनवण्याचे आवाहन करीत आहेत.
तेथील रहिवासी सांगतात की ते रात्री दोन वाजताही घराला पेंट करण्यापासून ते गवत कापण्यापर्यंत अनेक कामे करीत असतात. या बेटावरील लोकांनी पारंपरिक दिवस-रात्रीच्या चक्राचे पालन करणे सोडून दिले आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय याठिकाणी विचित्र वाटणार्या वेळीही सुरू असतात. पर्यटन, मासेमारी कधीही सुरू असतात. अर्थात काही बाबतीत वेळेचे पालन हे करावेच लागते. हॉटेलमधील व्यवस्थापनालाही ‘चेक-इन’ व ‘चेक-आऊट’चे व्यवस्थापन करणे ही तारेवरची कसरतच वाटते