School Uniform : राज्यात शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, कमिशनचा कोटयावधीचा खेळ ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी पालक जीवाचं रान करतात. कधी ओव्हारटाईम करून तर कधी काटकसर करून आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च ते करत असतात. पण शिक्षणाच्या नावाखाली याच पालकांची कशी लूट होते.

शाळेचा गणवेश विशिष्ठ दुकानातूनच घ्यायचे अशी सक्ती अनेक शाळांकडून केली जाते. जी किंमत असते त्या दर्जाचे कपडे असतात का? त्यात २ ड्रेस घ्या , स्पोर्ट्स चे वेगळे , २ शुज , हुडी , सॉक्स , वह्या पुस्तक,पण यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? एकच कारण आहे, आणि ते म्हणजे कमिशन. गणवेश विक्रेते या शाळाचालकांना टक्के कमिशन देतात . वर्षाला हजारो गणवेशांचा खप होतो. त्यामुळे कमिशनचा हा खेळ कोट्यवधींमध्ये जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *