महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – पुणे – कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे केंद्र सरकारला संपुर्ण देशात लाॅकडावुन अमलात आणावा लागला. संपुर्ण देशाचे सर्व प्रकारच्या उद्योग व कार्यालय दोन अडीच महिने पुर्णपणे बंद होते.सर्वांचे उत्पन्ना चे मार्ग- स्तोत्र बंदच होती……हाता वर पोट असणारा माणूस सुद्धा जेवणा साठी पैसे कमवु शकत नव्हता. कारण माणसाला इच्छा असून सुद्धा नोकरी धंदा करणे शक्य नव्हते कारण लाॅकडावुन असल्या मुळे कायद्यानुसार घरा बाहेर निघताच येत नव्हते.
त्या मुळे आर्थीक उत्पन्ना चे मार्ग बंदच होते. पैशां अभावी काही नागरिकांना भुके राहून दिवस काढावे लागलेत….ज्यांनी भाड्याने घर,ऑफिस व गोडावुन भाडयाने दिले होते त्यांनाही भाडे मीळाले नाहीत. लाॅकडावुन च्या कालावधीत भाडेकरुंनी भाडे दिले नाही म्हणुन भाडेकरुंना घरा बाहेर काढु नका असे आवाहन सरकारने च केले होते………………एकंदरीत लाॅकडावुन च्या कालावधीत सर्वांचेच उत्पन्ना चे मार्ग बंदच असतांना बँक कशी काय आपले उत्पन्न चालू ठेवू शकते. म्हणजे लाॅकडावुन च्या कालावधीत बँक कोणत्या आधारावर व्याज आकारु शकते. कोरोना Covid 19 हे जागतिक व संपुर्ण देशाचे संकट असल्या मुळे सर्वांचे उत्पन्न बंद तर बँकेचेही उत्पन्न बंद असायला पाहिजे. सर्वांना समान न्याय व अधिकार मिळायला पाहिजेत. बँका ह्या देशातील जनतेच्या हीतासाठी स्थापन झाल्या आहेत. बँकेचे व्यवस्थापण व कामकाज बघणारे पण देशाचेच घटक आहेत….
त्यांच्यातील पण काहींनी घरांसाठी कर्ज घेतले असतील. त्यांनाही व्याज माफीची सवलत मीळाली पाहीजे. म्हणुन लाॅकडावुन च्या कालावधीत सर्व प्रकारच्या कर्जांवर व्याज माफ झाले पाहीजे. ही काळाची गरज आहे. अर्थ शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता लाॅकडावुन च्या कालावधी तील व्याज माफीचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थे ला चालना मिळण्यासाठी आवश्यक आहे भले आज वित्तीय तूट वाढत असेल तरी सदर निर्णय घेणे देशाच्या हितासाठी योग्यच आहे. अपेक्षा आहे की केंद्र सरकार होकारार्थी निर्णय घेईल……पि.के.महाजन…जेष्ठ कर सल्लागार, पुणे .