निगडी भक्ती-शक्ती उद्यानाशेजारील हॉटेल तिरु बार अ‍ॅण्ड लॉजिंगमध्ये राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू

Spread the love

Loading

  • हॉटेल तिरु बार अ‍ॅण्ड लॉजिंग कायमस्वरुपी बंद करावे

  • सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचे जिल्हाधीकारी राजेश देशमुख यांना निवेदन

पिंपरीः
निगडी-प्राधिकरणातील भक्ती-शक्ती चौक पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात असून, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित या चौकातील शिल्प प्रसिद्ध आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी भक्ती-शक्ती उद्यान सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे स्मरण करून देणारे उर्जास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वगुणसंपन्न शक्ती व श्री संत तुकाराम महाराजांची निष्काम भक्ती व असंख्य स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानातून अभिमानाने उंचावलेला व राष्ट्रभक्ती जागृत करणारा राष्ट्रध्वज असा त्रिवेणी संगम या ठिकाणी साकार झालेला आहे. अशा या उर्जास्थानाला अनैतिक व्यवसायामुळे गालबोट लागले जात आहे. शहराचे वैभवात भर टाकत असलेले भक्ती शक्ती उद्यानाशेजारीच असलेल्या हॉटेल तिरु बार अ‍ॅण्ड लॉजिंगमध्ये राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी हे हॉटेल तिरु बार अ‍ॅण्ड लॉजिंग बंद करून कठोर कारवाई करण्यासंदर्भात निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, हॉटेल तिरु बार अ‍ॅण्ड लॉजिंग याठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय चालवला जात असून, अवघ्या १० ते १५ फुटांवर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे भक्ती-शक्ती शिल्प असून, देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज ही याच ठिकाणी असल्याने पर्यटक नागरिक याठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. दरम्यान याठिकाणी असले घाणेरडे प्रकार चालू असल्याने नागरिकांना आणि पर्यटकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हॉटेल तिरु बार अ‍ॅण्ड लॉजिंगवर बंदीची कारवाई करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *