Weather Update Today : पुण्यात आज कोसळणार सरी? पहा आजचे तापमान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुन । जून महिना आपल्या शेवटाकडे वाटचाल करत असून राज्यात उष्णतेची दाहकता कमी होताना दिसत नाही आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण असून पावसाची वाट पाहत आहेत.

पुण्यामध्ये काल 21 जून रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 22 जून रोजी शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अति हलका पाऊस पडण्याची शक्यता .

नागपुरातील उष्णतेचा पारा काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. नागपुरात काल 21 जून रोजी कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 22 जून रोजी नागपुरातील वातावरण कोरडे असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. आज 22 जून रोजी नागपुरात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तर विजांच्या कडकडाटासह तासी 40-50 किमी वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जना होण्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात नागपूरसह विदर्भातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही मात्र त्या नंतर 3-5 अंश सेल्सिअसने घट होईल असे अनुमान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
हे.

कोल्हापुरात आज 22 जून रोजी दिवसभर सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरात काल 21 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज 22 जून रोजी देखील सारखेच म्हणजे कमाल तापमान 33 अंश आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

मुंबईत काल 21 जून रोजी कमाल 34 अंश सेल्सिअस तर किमान 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज 22 जून रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असणार आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्ये काल 21 जून रोजी किमान 23 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते आणि कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस होते. आज 22 जून किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

कल्याण डोंबिवलीत उन्ह आणि घामानं नागरिक हैराण आहेत. काल 21 जून रोजी कल्याण – डोंबिवलीत कमाल तापमान 36 होते तर किमान तापमान 28 होते. तर आज 22 जून रोजी कमाल तापमान 35 तर किमान तापमान 28 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *