Video ; PM Modi in USA: ” कसा पकडायचा दारूचा ग्लास? ” बायडेन गुरुजींनी घेतला मोदींचा क्लास

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील स्टेट डिनर कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी इंडस्ट्री, फॅशन आणि राजकारण जगतातील अनेक सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. स्थानिक वेळेनुसार गुरुवारी झालेल्या या स्टेट डिनरमध्ये दोन्ही देशांमधील अंतर्गत संबंध वेगळ्या उंचीवर नेण्याची चर्चा रंगली होती.

पण यावेळी एका किस्स्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पोट धरून हसले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

स्टेट डिनर कार्यक्रमात एक विनोदी किस्सा घडला. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सहसा करून टोस्टसोबत अल्कोहोल प्यायले जाते. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दारूचे सेवन करत नसल्यामुळे ते टोस्टसोबत नॉन-अल्कोहोल जिंजर अले पेय पित होते. मोदींना पाहून बायडेन यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना एक किस्सा सांगितला.

यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, “माझे आजोबा अॅम्ब्रोस फिनेगन म्हणायचे की, जर तुम्हाला तुमच्या ग्लासमध्ये वाइन नको असेल तर तुम्ही ग्लास तुमच्या डाव्या हातात धरला पाहिजे. तुम्हा सर्वांना वाटत असेल की मी मस्करी करतोय पण तसे नाही.”

बायडेन यांच्या या सल्ल्यावर कार्यक्रमात उपस्थित लोकांसह पंतप्रधान मोदी मोठ्याने हसले. मोदींना बराच वेळ यावरून हसू आवरेना. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान, अमेरिकन सरकारने दिलेल्या डिनर पार्टीसाठी उद्योग, व्यवसाय, चित्रपट, राजकीय जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये भारताचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, आनंद महिंद्रा, प्रसिद्ध चित्रपट निर्माते एम. नाईट श्यामलन, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, प्रसिद्ध फॅशन डिझायनर राफ लॉरेन, माजी टेनिस दिग्गज बिली जीन किंग, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचा सामावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *