महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुन । पीएमपीएल ही पुणेकरांचीजीवन वाहिनी म्हणून संबोधली जाते. याचं पीएमपीएलने प्रवासासाठी आता मोबाइल ॲपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या पीएमपीएलने याची ट्रायल सुरू केली आहे. यामध्ये तुम्ही मोबाईल ॲपद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकिट काढू शकता.
मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा सध्या सात दिवसासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेली आहे. मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा बालेवाडी ते मनपा या मार्गावर्गावर सुरु करण्यात आली आहे. 256 नंबर या बसमध्ये तुम्हाला तिकीट काढता येणार आहे. 9 बसेसं मनपा ते बालेवाडी या मार्गासाठी सध्या चालू आहेत. याचा फायदा हा असा आहे की प्रवाशांना गर्दीमध्ये देखील तिकीट काढता येणार आहे. तसेच गर्दीमध्ये प्रवाशांनी तिकीट न काढल्यामुळे जो दंड भरावा लागतो त्याचे प्रमाण यामुळे कमी होणार आहे.
कशा पद्धतीने काढू शकता तिकीट ?
1) सर्व प्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये पीएमपीएल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
2) त्यानंतर नंबर टाकून OTP ने लॉगिन करू शकता.
3) बसमध्ये गेल्यानंतर QR कोड स्कॅन करू आपल्याला कुठं जायचं ते ठिकाण तुम्हाला दिसेल ते सिलेक्ट करून किती तिकिटे काढायचे ते सिलेक्ट करून पेमेंट गेटवे शोधून गूगल पे, फोन पे, यूपीआयने करून बुक माय तिकीट करून आपल तिकीट अरक्षित करा.
4) तुम्ही काढलेलं तिकीट जर चेकर किंवा कंडक्टरने चेक केल तर तुम्ही काढलेल्या तिकीट खाली एक QR कोडं तयार होत ते स्कॅन केल की त्यावर तुम्ही ते तिकीट कुठून कुठं पर्यंत काढलं आहे. तसेच त्यासाठी किती पैसे दिले आहे त्याची सगळी माहिती तुम्हाला दिसेल.
अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल ऑनलाईन तिकीटचा वापर करू शकता.
ही चाचणी जर यशस्वी रित्या पूर्ण झाली. यामध्ये काही त्रुटी आढल्या नाही तर या QR कोडं स्कॅनिंगचा वापर तुम्हाला सर्व बसमध्ये करता येईल. परंतु आता प्रवाशांनी या ॲपचा वापर करावा,असं पीएमपीएलचे कर्मचारी शिरीष कालेकर यांनी सांगितले.