Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ इच्छेवर अखेर शरद पवार बोलले ; लवकरच होणार निर्णय…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुन । विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad pawar on ajit pawar ncp state chief post Jayant Patil maharashtra politics )

शरद पवार सध्या बारामती येथे आहेत. यावेळी त्यांनी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. दरम्यान, अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवरही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेमणुकांचा निर्णय मी एकटा घेत नाही. अजित पवार यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर त्यांच्यासोबत पक्षातील प्रमुख लोक बसतील. सर्वांमध्ये चर्चा होईल आणि त्या संबंधीचा निर्णय घेतील.

पक्षात संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष द्यावं अशी प्रत्येकाची भावना आहे. तेच मत त्यांनी त्याठिकाणी व्यक्त केलं आहे. त्यापेक्षा वेगळ काही नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *