महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी ते १८९८ ला इंग्लंड राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते, असे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे.
पुण्यातील दिघी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी भिडे म्हणाले, १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी फाळणी झाली होती. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतले. वंदे मातरम म्हटलं ते व्यर्थ नाही. आता ठाम निर्धार करायचा…१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य, पण ते हांडगं स्वातंत्र्य असेल. ते पत्करलं पाहिजे, असेही ते म्हणाले.