महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । अभिनेता सलमान खानला मागील काही महिन्यांपासून जीवे मारण्याची धमकी येत होती. धमकी प्रकरणामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सलमान खानची धमकी प्रकरण काही महिने शांत झालेले असताना आता पुन्हा एकदा त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गोल्डी बरार याने सलमानला धमकी दिली आहे. या आधी देखील अनेकदा त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या धमकी दरम्यान गोल्डी बरार यानं एका महत्त्वाच्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत गोल्डीनं मीच सिद्धू मुसेवालाची हत्या केली आणि आता सलमान खानला देखील मीच मारणार असं खुलेआम सांगून टाकलं आहे.
बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या गोल्डी बरारनं सलमान खानला खुलेआम चितावणी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला मारण्याचे खास निर्देश मिळाले आहेत त्यामुळे सलमानला आम्ही नक्की मारणार असं त्याने म्हटलं आहे. त्याने म्हटलंय, “जस की भाईसाहब ( लॉरेंन्स बिश्नोई ) ने स्पष्ट सांगितलं आहे की आता त्याने जरी माफी मागितली तरी आम्ही त्याला माफ करणार नाही. आमचं पुढचं टार्गेट सलमान खान आहे हे आम्ही आधीच सांगितलं आहे. आम्ही यशस्वी होत नाही तोवर प्रयत्न करत राहू आणि जेव्हा आम्ही यशस्वी होऊ तेव्हा ते सर्वांना कळेलच”.
पंजाबी सिंगर सिदूध मुसेवाच्या हत्येची कबूली देत गोल्डी बरारने म्हटलं की, “आम्ही ते खूप विचार करून केलं. ते गरजेचं होतं आणि आम्ही केलं”. सिद्धू मुसेवालाला मारण्याचं कारण सांगताना तो म्हणाला, “तो खूप अहंकारी आणि वाया गेलेला होता. त्याच्याकडे खूप पैसा होता. राजकीय तादक होती. तो पोलिसांची ताकद गरजेपेक्षा जास्त वापरत होता. त्यामुळे त्याला धडा शिकवणं महत्त्वाचं होतं”.