चक्रवाढ व्याजा पासुन सुटका मिळवण्याची दाट शक्यता:

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – पि.के. महाजन – : मोरोटोरीयम पिरीयड मधील कर्जा वरील व्याज करण्याा बाबत उच्च न्यायालयात काल सुनावणी होती …सदर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला व वित्तीय मंत्रालयाला पुन्हा 17 जून पर्यंत बाजू मांडण्याला मुदत वाढवून दिली आहे. कर्जांच्या हप्ता बाबतीत सहा महिन्या च्या मोरोटोरीयम पिरीयड च्या दिलेल्या सवलती बरोबर सहा महिन्याचे व्याज व व्याजावर व्याज आकारणे अन्यायकारक आहे असे उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला व सरकार ला सुनावले आहे.

एकंदरीत मोरोटोरीयम पिरीयड च्या सवलती मुळे कर्जदाराला चक्रवाढ व्याजा मुळे मोठा भूर्दंड सोसावा लागेल व एक प्रकारचा जनतेवर अन्याय आहे. तरी रिझर्व्ह बँकेने व सरकार शी निगडित वित्त मंत्रालयाने एकत्रित बसुन निर्णय घ्यावा व त्या संबंधित खुलासा पुढील सुनावणी त म्हणजे 17 जुन ला करावा असे आदेश दिले आहेत. व्याजा वर व्याज ह्या अन्यायकारक मुद्यावर उच्च न्यायालय काही तरी मधला मार्ग काढुन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. चक्रवाढ व्याजा पासुन सुटका मिळवण्याची दाट शक्यता आहे ? ……..
…….पि.के. महाजन… जेष्ठ कर सल्लागार, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *