ENG vs AUS 2nd Test: लॉर्ड्स कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । Marnus Labuschen injured before 2nd test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २८ जून २०२३ पासून लॉर्ड्सवर मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. खरे तर संघाचा अनुभवी फलंदाज आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला मार्नस लबुशेन दुखापतग्रस्त झाला आहे. तो या सामन्यात खेळेल याची खात्री नाही.

मार्नस लाबुशेनला कशी झाली दुखापत?
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज मार्नस लाबुशेनला लॉर्ड्सवर नेट सत्रादरम्यान हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या अॅशेस कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये चिंता वाढली आहे. शनिवारी जेव्हा तो आणि स्टीव्ह स्मिथ दोघेही नेट सेशनमध्ये भाग सहभागी झाले होते, तेव्हा लीबुशेनच्या बोटाला दुखापत झाली. लाबुशेन आणि स्मिथ यांच्या व्यतिरिक्त, संघाचे राखीव खेळाडू उपस्थित होते, त्यावेळी कोचिंग स्टाफने त्यांच्याकडून थ्रोडाउनचा सराव करुन घेतला.

दुखापतीनंतर त्याला तीव्र वेदना होत होत्या आणि तो अचानक जमिनीवर बसला. यानंतर डॉक्टरांनी त्याचे बोट तपासले. त्यानंतर त्यांनी मैदान सोडले. तो नंतर खेळायला आला असला तरी तो लयीत दिसला नाही. पुढच्या सामन्यात तो खेळेल की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.

मार्नस लाबुशेनचा कसोटी रेकॉर्ड –
मार्नस लाबुशेनने आतापर्यंत ३९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी त्याने ३४७४ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने १० शतके आणि १५ अर्धशतकेही केली आहेत. लाबुशेनने इंग्लंडमध्ये ६ सामने खेळले असून त्यात ४३३ धावा केल्या आहेत. त्याची स्टीव्ह स्मिथसोबतची जोडी शानदार आहे. दोघांनी मिळून खूप धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link