महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुन । साठ आणि सत्तरीच्या दशकात रुपेरी पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी (80) यांचे मलबार हिल येथील राहत्या घरी अलीकडेच निधन झाले. कित्येक वर्षे मूत्रपिंडाच्या आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील जन्मलेल्या आशा नाडकर्णी यांचे बालपण पुण्यातील सोमवार पेठ येथील सारस्वत कॉलनीमध्ये गेले. त्यांचे कुटुंब 1957 ला मुंबईमध्ये आले आणि तेव्हापासून त्यानी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्तम नर्तिकादेखील होत्या 1957 ते 1973 या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत काम केले. यात नवरंग (1959), गुरू और चेला (1973), चिराग (1969), फरिश्ता (1968), श्रीमानजी (1968) या चित्रपटांचा समावेश आहे.