महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवर राज ठाकरेंना शुभेच्छा देताना “सुदामाचे राजधन” या शिर्षकाखाली आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “सुदामाची ओळख ही जगाला कृष्णप्रेमामुळे आहे. सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाले तरी सातत्याने लोक अजूनही देत असतात. सुदामाकडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते. तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते राज ठाकरे यांच्यामुळेच आहे. माझ्याकडे सुद्धा त्यांना देण्यासारखे म्हणजे माझी ‘निष्ठा’ जी मी कधीच अर्पण केली आहे.”
https://twitter.com/BalaNandgaonkar/status/1271874290997059584
याचबरोबर, “मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख “राजनिष्ठ” अशीच आहे. राज ठाकरेंचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे “राजधन”. योगायोग असाही आहे की राज ठाकरेंच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा “कृष्णकुंज”च आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे राज ठाकरेंना राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची प्रेमळ भेट होणार नाही. त्यामुळे सर्वांच्या मनात यावर्षी एकच ओळ नक्की असणार आहे, ‘साहेब प्राण तळमळला’. पण हा दुरावा तात्पुरता असून राज ठाकरे आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करुन जनतेच्या हिताचे काम करु. आज राज ठाकरेंच्या जन्मदिनी मी एकच सांगेन “तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए,” असंही बाळा नांदगावकर यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले.
https://twitter.com/rautsanjay61/status/1272027114254954496
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, “वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले. असे व्यंगचित्रकार. रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी स्वतः कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी न येता आहे तेथे सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना मदत करण्यास सांगितले आहे. त्यामुळे दरवर्षी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी येणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची काहीशी निराशा पाहायला मिळणार आहे.