महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणेकरांनो, आपण सारे कोरोनाला खूपच घाबरतोय. साधा ताप, थंडी, सर्दी जाणवली, तरी काळजात धस्स होतंय; पण आपण या आजाराला सहज हरवू शकतो, हे शहरातील सुमारे चारशे लहानग्यांनी दाखवून दिलेय. कोरोनामुक्त झालेली ही बच्चे कंपनी सध्या मस्तपैकी खेळत-बागडत आहे.
आनंदाची बाब म्हणजे 14 दिवसांच्या “होम क्वारंटाइन’नंतर यातील एकाही मुलाला कुठलाच त्रास नसल्याचे तपासणीतून दिसून आले आहे. पुण्यात गेल्या अडीच-पावणेतीन महिन्यांत 1 ते 10 वर्षे वयोगटातील 577 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील 67 टक्के मुले पूर्णपणे बरी झाली आहेत. उर्वरित मुलांवर उपचार सुरू आहेत, ती सगळी उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून, त्यांनाही घरी सोडण्यात येणार आहे.
शहरात आजतागायत सुमारे नऊ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील सर्वाधिक प्रमाण हे 40 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचे आहे. दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही या आजाराचा संसर्ग झाला आहे. त्यातून मुले बरे होतील का, अशी शंका होती; परंतु ती खोटी ठरवत बहुतांशी मुला-मुलींनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे.
कोरोनाग्रस्त मुलांवर बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार केले जात आहेत. अन्य रुग्णांप्रमाणेच त्यांना उपचार दिले जातात. या मुलांमध्ये इतरही काही आजार असल्याचे दिसून आले असून, त्या आजारासह त्यांच्यावर कोरोनाचेही उपचार केले जात आहेत. बहुतांशी मुले उपचारादरम्यान 14 दिवसांत ठणठणीत झाली आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
कोरोनाबधित मुले / वय मुलांची संख्या
1 24
2 75
3 38
4 43
5 48
6 53
7 76
8 78
9 60
10 82
————————
एकूण बाधित
577
मुले
309
मुली
268
———–
कोरोनामुक्त
एकूण 388
——
मुले
205
मुली
183
———-
उपचार सुरू असलेले
एकूण 187
मुले
102
मुली
85