महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ जुलै । जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱया दहावी, बारावी फेरपरीक्षेचे हॉलतिकीट 5 जुलैपासून उपलब्ध होणार आहे. शाळांनी ऑनलाईन हॉलतिकिटाचे प्रिंट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी जारी केल्या आहेत.
हॉलतिकिटावर काही चुका अथवा दुरुस्त्या करायवयाच्या असतील तर शाळास्तरावरून विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधायचा आहे. विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळेने विद्यार्थ्यांस हॉलतिकिटाची पुन्हा प्रिंट काढून द्यावी व त्यावर लाल शाईने डुप्लिकेट प्रत असा शेरा लिहिलेला असावा, असेही ओक यांनी स्पष्ट केले.