ITR फाइल करताना या चुका टाळा ; नाहीतर Income tax विभागाकडून येईल नोटीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ जुलै । ITR म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न फायइल करणं हे केवळ जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठीच नव्हे तर महिन्याला किंवा वर्षाला ठराविक रक्कम कमवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं आहे. Know This Before Filing Income Tax Return to Avoid IT Department Notice

इन्कमटॅक रिटर्न फाइल Income Tax Return Filing करताना तो काळजीपूर्वक फाइल करणं गरजेचं आहे. तुमच्या साध्या साध्या चुका देखील आयकर विभागाकडून अधोरेखित केल्या जाऊ शकतात आणि तुम्हाला नोटीस पाठवली जाऊ शकते.

आयकर विभागाची नोटीस Notice टाळायची असेल तर इनकम टॅक्स रिटर्न फाइल करताना काही सामान्य चुका टाळणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला अशा ५ चुका सांगणार आहोत ज्या प्रकर्षाने टाळा.

व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती- अनेकजण रिटर्न फाइल करताना FD, RD, टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट स्कीम, बचत खाते ,इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्सवर मिळणारे व्याज याची माहिती पुरवत नाहीत. या व्याजावर टॅक्स लागत नाही असा अनेकांचा समज असतो मात्र हा समज चुकाचा आहे. तुम्हाला विविध ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीतून मिळणाऱ्या व्याजाची माहिती देखील ITRमध्ये देणं बंधनकारक आहे.

FDची माहिती लपवणं- अनेकजण कर वाचवण्यासाठी एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये एफडी खात सुरु करतात. यामुळे टीडीएस कापला जाणार नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र आयकर खात्याकडे तुमच्या सर्व प्रकारच्या खात्यांची माहिती असते ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे.

तुम्ही तुमच्या सर्व TDS खात्यांवर मिळणाऱ्या व्याजाची योग्य माहिती दिली नाही, तर त्यावर दंड आकारला जाऊ शकतो. यासाठीच रिटर्न फाइल करण्यापूर्वी फॉर्म 26AS नक्की तपासा.

प्रॉपर्टीवरील टीडीएस TDS जमा न करणं- जर तुम्ही गेल्या आर्थिक वर्षात ५०लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची रेसिडेंशियल म्हणजेच निवासी मालमत्ता खरेदी केली असेल म्हणजेच एखादं घर खरेदी केलं असेल आणि त्यावर एका आठवड्याच्या आत १ टक्के TDS जमा केला नसेल, तर तुम्हाला नोटीस पाठवण्यात येईल आणि १ लाख रुपयांचा दंड आकारला जाईल.

तसंच इतर देशात तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी केली असेल आणि त्याची माहिती लपवल्यासही तुम्हाला १० लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

जुन्या कंपीनीच्या पगाराची माहिती न देणं- अनेकजण विविध कारणांनी नोकरी बदलत असतात. आयटीआर फाइल करत असताना तुम्ही नव्या कंपनीत असाल तरी तुम्हाला जुन्या कंपनीतील पगाराची माहिती रिटर्नमध्ये देणं गरजेचं आहे.

ही माहिती न दिल्यास तुम्हाला नोटीस पाठवली जाऊ शकते. आयकर विभागाकडे तुमच्या खात्यामध्ये होणाऱ्या सर्व ट्रान्झेक्शनची माहिती असल्याने तुम्हाला जुन्या कंपनीतील पगाराची माहिती द्यावी लागेल.

फॉर्म 15G आणि 15H चा गैरवापर- ज्या लोकांच उत्पन्न कमी आहे. म्हणजेच जे टॅक्स भरण्यास पात्र नाहीत अशा लोकांसाठी फॉर्म 15G आणि 15H हे एका प्रकारचे डिक्लरेशन फॉर्म आहेत.

६० वर्षाखालील ज्या लोकांचं उत्पन्न करसूटीसाठी पात्र आहे त्यांनी 15G भरावा तर ६० वर्षांवरील सिनियर सिटिझन्सना फार्म 15H कर सूट मिळण्यासाठी भरावा लागतो.

कर सूट मिळवण्यासाठी जर तुम्ही या फॉर्मचा चुकीचा वापर केला तर तुम्हाला नोटीस पाठवली जाऊ शकते. तसचं तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *