अजित पवार होणार मुख्यमंत्री, तारीखही ठरली? दिल्लीश्वरांचा पाठिंबा! पृथ्वीराज चव्हाणांचे भाकित खरे ठरणार का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जुलै ।अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचा ठाम दावा एका इंग्रजी न्यूज पोर्टलने केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र घोषित ठरतील. त्यानतंर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देतील. यामुळे आपसूकच राज्य मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे या पोर्टलने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे.

11 ऑगस्टला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

अजित पवार संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर येत्या 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे, असे रेडिफने आपल्या वृत्तात म्हटले आहे. रेडिफच्या या दाव्यामुळे अगोदरच अस्वस्थता पसरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ माजली आहे.

मार्च 2022 पासून अमित शहांच्या संपर्कात

एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. तत्पूर्वी, अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. पण भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा या न्यूज पोर्टलने आपल्या वृत्तात केला आहे.

अजित पवार मार्च 2022 पासून अमित शहांच्या नियमित संपर्कात होते. शिंदेंच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती, तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचे भाकित खरे ठरणार?

काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परवाच शिंदे यांच्या जागी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा सौदा झाल्याचा दावा केला होता. अजित पवार भाजपसोबत जाणार हे मी अगोदरच जाहीरपणे सांगितले होते, पण मला टीकेला सामोरे जावे लागले. या प्रकरणी केवळ अजितदादांना काय मिळणार याची बार्गेनिंग सुरू होती. माझ्या माहितीनुसार, सभापतींच्या निर्णयाच्या मदतीने (म्हणजे एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवून) शिंदेंची मुख्यमंत्रीपदावरून (शिंदे) हकालपट्टी केली जाईल. त्यानंतर अजित पवारांना मुख्यमत्री केले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे, असे चव्हाण म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *