Gold Rate Today: सोने-चांदीच्या भावात मोठा बदल ; पाहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जुलै । जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीत ही चढउताराचे सत्र सुरूच आहे. मे, जून महिन्यात दोन्ही धातूंनी रिव्हर्स गिअर टाकला होता, मात्र जुलैच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या वर्षी दिवाळीपासून सोन्या-चांदीच्या दरांनी वाढ नोंदवली असून फेब्रुवारी आणि नंतर एप्रिल महिन्यात मौल्यवान धातूंच्या किंमतींनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र, मे पासून सोने-चांदीची घसरगुंडी सुरू झाली, ज्यामुळे ग्राहकांना खरेदीवर दिलासा मिळाला.

आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी सोन्याच्या दरात वाढ नोंदवली असून चांदीच्या दरात घट झाली आहे. सोन्याचा भाव वाढला असला तरी प्रति १० ग्राम ५८ हजार रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. आज सोन्याच्या किमतीत तेजी दिसून येत असून बुधवारी सकाळी एमसीएक्स एक्स्चेंजवर सोन्याच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

सोन्याचा ऑगस्ट वायदा वाढीसह ५८ हजार ४१० रुपये प्रति १० ग्रॅमवर खुला झाला आणि काही काळानंतर ५८ हजार ४१७ रुपयांवर व्यवहार करताना दिसला. विशेष म्हणजे आज जागतिक बाजारातही सोने महागले आहे. दुसरीकडे, सोन्याच्या दरात तेजी दिसत असताना चांदी मात्र आज आणखी स्वस्त झाली आहे. चांदीचा ऑगस्ट वायदा MCX वर ७० हजार ४३७ रुपये प्रति किलोवर खुला झाला असून काल मंगळवारी किंमत ७० हजार ५४२ रुपयांवर क्लोज झाला होता.

सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किमती
४ जुलै रोजी सोन्यात तेजी दिसून आली असून २४ कॅरेट सोने ५८ हजार ५२ रुपये, तर २२ कॅरेट सोने ५३,६०६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात सोन्याचा प्रति तोळा भाव ६२ हजार रुपयांच्या घरात पोहोचला होता. पण चांदीने मोठी उसळी घेतली नाही आणि गेल्या दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *