3rd Ashes Test : जेम्स अँडरसन इंग्लंड संघातून बाहेर, 2 कसोटी गमावल्यानंतर संघात 3 मोठे बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जुलै । जेम्स अँडरसन इंग्लिश संघाबाहेर गेला आहे. तिसऱ्या अॅशेस कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी देण्यात आली नाही. तिसरा अॅशेस कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लीड्स येथे खेळला जाणार आहे, ज्याची प्लेइंग इलेव्हन इंग्लंडने एक दिवस आधी जाहीर केली होती. इंग्लिश संघ याआधीच मालिकेत 0-2 असा पराभूत झाला असून आता अॅशेस मालिका वाचवण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावणार आहेत.

अशा परिस्थितीत संघात 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. ऑली पोप, जेम्स अँडरसन आणि जोश टँग यांना तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी ख्रिस वोक्स, मोईन अली, मार्क वुड आले आहेत. पहिल्या अॅशेस कसोटीत दुखापतग्रस्त मोईन अलीचे पुनरागमन झाले आहे. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा उपकर्णधार ऑली पोपलाही दुखापत झाली होती. त्याचा खांद्याला दुखापत झाली होती.

ओली पोप याच्या खांद्यावर आता शस्त्रक्रिया होणार आहे. तो संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. पोपच्या अनुपस्थितीत हॅरी ब्रूक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याचवेळी जेम्स अँडरसन या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याला 4 डावात केवळ 3 विकेट घेता आल्या. त्याला बर्मिंगहॅममध्ये एक विकेट मिळाली आणि लॉर्ड्स कसोटीत 2 यश मिळाले. सतत खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या अँडरसनबाबत इंग्लंडने मोठे पाऊल उचलले आहे.

इंग्लिश संघाबाबत बोलायचे झाले, तर तो मालिकेत आधीच मागे पडला आहे. अशा परिस्थितीत त्याला कोणतीही चूक करण्याची संधीही नाही. एक चूक आणि मालिका त्याच्या हातातून निघून जाईल. अशा स्थितीत बेन स्टोक्स कोणत्याही प्रयोगाच्या मूडमध्ये नाही. आता त्यांना फक्त निकाल हवा आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 2 विकेट्सने तर दुसरी कसोटी 43 धावांनी गमावली.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *