महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जुलै । पुण्यासह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी सांगितले. पुणे शहर परिसरात 30-40 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर शहराच्या आसपासच्या घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना पुढील 48 तासांसाठी घाट परिसरात प्रवास टाळण्याचा किंवा आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रवास करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह महाराष्ट्राच्या काही भागातदेखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 6 आणि 7 जुलै रोजी खंडाळा, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, वाई आणि मुळशी तहसीलमध्ये जोरदार पाऊस होईल. नागरिकांनी सर्व घाट भागात प्रवास टाळावा आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ओलांडताना खबरदारी घ्यावी. पुणे शहरातही हळूहळू पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 24 तासांत पुणे शहरात 35-45 मिमी पाऊस अपेक्षित आहे. हिंजवडी, तळेगाव, बावधन आणि पश्चिम पुण्यातील इतर भागात 50 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
5 Jul: IMD ने आज महाराष्ट्रासाठी पुढील 4, 5 दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. पुढील ३,४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी.खूप दिवसांनी रेड अलर्ट दिसतोय
कृ IMD कडील माहितीनुसार योजना करा. काळजी घ्या@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/tXh9kIpdCE— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2023
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस अजूनही पडला नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी पावसाची गरज आहे. जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.