महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – शहरात रविवारी 320 नवीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकुण बाधितांची संख्या 9 हजार 656 वर पोचली आहे. दिवसभरात 123 जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत 6 हजार 210 जण बरे झाले आहे. म्हणजेच रविवारी नवीन रुग्ण सापडण्याची संख्या दुप्पट तर बरे होणा-या रुग्णांची संख्या ही निम्मीच दिसून आली. सध्या 203 रुग्णांची तब्येत गंभीर असून त्यापैकी 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
कोरोनामुळे गेल्या 24 तासांत पुण्यात (पुणे, पिंपरी -चिंचवड व ग्रामीण) 365 नवे रुग्ण आढळले असून 14 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील एकुण मृतांचा आकडा 499 झाला आहे. रविवारी 162 रुग्णांना घरी सोडले असून आतापर्यंत 7 हजार 619 जणांना घरी सोडण्यात आले.
पुणे शहरात 9, पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील 2, खडकी कॅन्टोनमेंट परिसरातील 1 आणि पिंपरी चिंचवड दोन अशा 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुणे शहरात 448 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बिबवेवाडी येथील पुरूष (76), वानवडीतील पुरूष (60), पांडवनगर येथील महिला (74), बाणेर येथील पुरूष (79), कोंढव्यातील पुरूष (67), वडारवाडी, पांडवनगर येथील तरूण (36), कोथरूड येथील पुरूष (75), मंगळवार पेठेतील पुरूष (59) आणि गुलटेकडी येथील पुरूष (55) यांचा मृत्यू झाला. तर, पुणे कंटोनमेंट परिसरातील दोन आणि खडकी कंटोनमेंट परिसरातील एक रुग्ण मृत्यू पावले. तर, पिंपरीतील एका महिलेचा (वय 40) आणि अजंठानगर येथील पुरुषाचा (वय 47) कोरोनामुळे मृत्यू झाला.
पिंपरी-चिंवड शहरात रविवारी कोरोनाचे एकूण 28 नवे रूग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण संख्या 1 हजार 145 झाली आहे. 932 संशयित रूग्णांना वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनातून बरे झालेल्या 56 जणांना घरी सोडण्यात आले.
आणखी चार पोलिसांना कोरोना
पुण्यात चार पोलिस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली असून आत्तापर्यंत पोलिस दलातील 74 जणांना कोरोना झाला आहे. त्यातील 46 जणांनी कोरोनावर मात केली असून 26 जण सध्या उपचार घेत आहे. आतापर्यंत दोघांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.