महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांनी परत यावं. ते जर पुन्हा आले तर मी राजकारणातून बाजूला होईल. माझाच जर अडसर असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे. मी जयंत पाटील यांना देखील राजकारणातून बाजूला घेऊन जाईल, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत जे लोकं गेली आहेत त्यांनी परत यावं. ते जर परत आले तर मी राजकारणातून बाजुला होईल. मी जयंत पाटील यांना देखील बाजुला व्हायला सांगेल. मात्र तुम्ही शरद पवारांना 84 व्या वर्षी ज्यापद्धतीनं वागवता आहात ते चुकीचं आहे. त्यांना निवृत्त व्हा असं म्हणंण बरोबर नाही. ज्या पद्धतीनं त्यांच्याबाबत वक्तव्य केली गेली ते बरोबर नाहीत. कृपा करून साहेबांना या वयात त्रास देऊ नका, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेल्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. आज शरद पवार यांची पहिली सभा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील येवल्यात पार पडत आहे. शरद पवार या सभेमध्ये काय बोलणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.