नोकरी विषयक ; पुणे महापालिकेत भरती, ‘ही’ पदे भरली जाणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । पुणे: महापालिका प्रशासनाने ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दीवाढीमुळे महापालिका प्रशासनावर ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून कनिष्ठ अभियंत्यांबरोबरच सात उपकामगार अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या प्रत्येकी एका जागेसाठी येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी राज्य सरकारने भरतीवरील स्थगिती उठविल्याने प्रशासनाने कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांच्या ४४८ जागांची भरती प्रक्रिया पार पूर्ण झाली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ९ पदांवरील ३२० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांची नुकतीच ऑनलाइन परीक्षा झाली आहे. कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

भरती सुरू असताना आता ११० कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सात उपकामगार अधिकारी, एक उपमुख्य अग्निशमन अधिकारी, एक विभागीय अग्निशमन अधिकारी, एक सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयबीपीएस संस्थेसोबत पुढील चर्चा करून या पदांसाठी जुलै महिनाअखेरपर्यंत जाहिरात काढून उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विविध विभागांवर त्याचा ताण येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *