Amarnath Yatra करताय ? मग या वस्तू नक्की सोबत घेऊन जावा ; अडचणींमध्ये येतील कामी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । दरवर्षी भारतातील हजारो भक्त बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी अमरनाथ यात्रेमध्ये Amarnath Yatra सहभागी होत असतात. यंदा अमरनाथ यात्रा ही ६२ दिवसांची आहे. १ जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. Tourism Tips Know about preparation for Amarnath Yatra

हिंदू धर्मामध्ये Hindu Religion अमरनाथच्या यात्रेला मोठं महत्व आहे. यासाठीच देशातीलच नव्हे तर परदेशातीलही असंख्य शिव-पार्वती भक्त या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सामिल होत असतात. अमरनाथ यात्रेचा Amarnath Yatra प्रवास हा अत्यंत कठीण आहे. जवळपास १३ हजार फूट उंचीवर असलेल्या या गुफेपर्यंत पोहचण्यासाठी भक्तांना अनेक अडथळे पार करावे लागतात.

अमरनाथ यात्रेला जर तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर तुम्हाला या यात्रेविषयी आणि प्रवासात येऊ शकणाऱ्या विविध समस्यांची कल्पना असणं गरजेचं आहे. संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही संपूर्ण तयारीने अमरनाथ यात्रेला निघाल्यास तुमचा प्रवास नक्की चांगला आणि सुकर होवू शकतो.

अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी तुम्ही पूर्वी अमरनाथ यात्रा आधी केलेल्यांकडून किंवा ऑनलाईन यात्रेची माहिती मिळवू शकता. त्यासाठी लागणारी कागदपत्रं, प्रवासाचे मार्ग, खर्च याची संपूर्ण माहिती घ्यावी. त्याचसोबत तुम्ही शारिरीकदृष्ट्या फिट असणं अत्यंत गरजेचं आहे.

अमरनाथ यात्रेपूर्वी तुम्ही आवश्यक आणि महत्वाच्या वस्तूंची एक यादी तयार करावी. या वस्तू सोबत नेल्यास तुमचा प्रवास सोपा होईल. अमरनाथ यात्रेसाठी कोणत्या वस्तू गरजेच्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जम्मू काश्मिरमध्ये Jammu Kashmir या काळामध्ये थंड वातावरण असल्याने उबदार कपडे सोबत बाळगावे. तसंच या ठिकाणी जुलै आणि ऑगस्टच्या काळात अनेकदा हवामानाची शक्यता वर्तवणं कठीण असतं. अनेकदा पावसाची शक्यता असते. त्यादृष्टीने जास्त कपडे सोबत बाळगावे.

खास करून थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेट, टोपी, हातमोजे, मोजे, शाल अशा गोष्टी सोबत नेण्यास विसरू नका.

अनेकदा मार्गामध्ये मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी तुमचं सामान भिजू नये म्हणून सामानासाठी वॉटरप्रूफ बॅग घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *