महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । राज्यातील काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्यातील अनेक भागामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचा चिंता आणखी वाढली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात पेरण्या शेतीकामे खोळंबली आहेत. राज्यातील कोकणासह मुंबई उपनगर ठाणे या परिसरात चांगला पाऊस पडत आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.(Latest Marathi News)
दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आण विदर्भातह यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातही यलो अलर्ट दिला आहे.(Latest Marathi News)
राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तर येत्या 4,5 दिवसात कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पुण्यातही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Latest Marathi News)
मुंबईत मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे.