महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । आज सायंकाळी देहूनगरीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल होणार आहे. यासाठीच देहूनगरी नटली आहे.मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कालच आळंदीत विसावली. तर आज सायंकाळी देहूनगरीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल होणार आहे. यासाठीच देहूनगरी नटली आहे.
10 जूनला तुकोबांच्या तर 11 जूनला माऊलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं होतं.आषाढी एकादशीला विठुरायांशी भेट घेतली अन् त्यानंतर दोन्ही पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.महिन्याभराचा पायी प्रवास पूर्ण करुन काल माऊलींची पालखी आळंदीत विसावली. तर तुकोबांची पालखी आज देहूनगरीत पोहोचेल अन आषाढी पायी सोहळ्याची सांगता होईल.