एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत फैसला लवकरच होणार; सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सध्या कोणती प्रक्रिया सुरु आहे, असा सवाल विचारण्यात आला आहे.यावर उत्तर देण्यासाठी राहुल नार्वेकर यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे येत्या दोन आठवड्यांमध्ये राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडावी लागणार आहे. यावेळी राहुल नार्वेकर काय सांगतात, हे पाहावे लागेल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना कोणते निर्देश देणार का, हेदेखील लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील मुद्दा लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात. तसेच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद देखील जाऊ शकते. त्यादृष्टीने राहुल नार्वेकर यांची प्रत्येक भूमिका आणि कृती आता महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *