Mobile Theft : चोरीला गेलेला मोबाईलही परत मिळू शकतो, ‘या’ मार्गाचा करा वापर, Video

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । मोबाईल चोरीचे प्रमाण सध्या वाढलंय. मोबाईल चोरी झाल्यानंतर काय करावे हे अनेकांना समजत नाही. चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळणार नाही अशी अनेकांची समजूत असते. मोबाईल चोरी झाल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही. काही आवश्यक गोष्टी केल्यानंतर तुमचा मोबाईल सापडू शकतो. याबाबत नेमकं काय करावं याची माहिती डोंबिवलीविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिलीय.

पहिली कृती

तुमचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात प्रथम सीईआयआर (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) या वेबसाईटवर जा. या वेबसाईटवर नोंद केल्यास पोलीस स्टेशनमध्ये तातडीनं जाण्याची गरज नाही. या वेबसाईटच्या पहिल्या पेजवर तीन ऑप्शन दिले आहेत. यामध्ये मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ब्लॉक करणे, आपला मोबाईल शोधण्याचे काम कुठपर्यंत आले त्याचे स्टेटस् चेक करणे आणि पुन्हा मिळाल्यास तो अनब्लॉक करणे, असे हे तीन ऑप्शन आहेत.

 

मोबाईल चोरी झाल्यानंतर पहिला ऑप्शन वापरून हा मोबाईल ब्लॉक करावा लागतो. त्यामध्ये काही नंबर, हरवलेल्या मोबाईलचा आईएमईआई हा नंबर द्यावा लागतो. तो मोबाईल कधी, कुठून आणि कसा हरवला यासंदर्भात माहिती द्यावी लागते. त्यानंतर ही सर्व माहिती पोलिसांना मिळते.त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये या मोबाईल चोरीची नोंद केली जाते.

तुम्हाला यापैकी कोणताही पर्याय शक्य नसल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार करावी. ही तक्रार करण्यासाठी मोबाईलची पावती किंवा तो बॉक्स जपून ठेवणे आवश्यक आहे, असा सल्ला कुराडे यांनी दिलाय.

कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती, पाहा महानगरपालिकेचा खास प्रकल्प Video

कसा शोधतात मोबाईल?

एखादा मोबाईल चुकून कुठे हरवला असेल आणि तो कुणी उचलला तर पोलिसांचा फोन आहे असं कळल्यावर संबंधित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये फोन जमा करते, अशी माहिती कुराडे यांनी दिली. मोबाईलची चोरी केली असल्यास ती व्यक्ती त्यामधील सीमकार्ड सतत बदलत असते, त्यावेळी आईएमआयई नंबरहून फोन शोधून काढता येचतो.

फोन चोरी झाल्यानंतर घाबरून न जाता बिनधास्त तक्रार नोंदवा. त्यामुळे तुमचा फोन चुकीच्या माणसाच्या ताब्यात गेला असेल तर त्यामुळे होणारा अनावश्यक त्रास टाळता येतो, असं कुराडे यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *