महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी : ओमप्रकाश भांगे – अनलॉक नंतर पहिल्यांदाच राज्यात एका दिवशी 5 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा पहिल्यांदाच वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ होण्याचं प्रमाण कायम आहे.
एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी 178 जणांचा आज राज्यात कोरोनामुळे मृत्यू नोंदवला गेला आहे. आजही राज्यात अडीच हजारांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 2786 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 110744 झाली आहे. गेले काही दिवस राज्यात सातत्याने अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातला आकडा भराभर वाढतो आहे. राज्यात आतापर्यंत 4128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.