महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी : संजीवकुमार गायकवाड – आपत्कालीन कठीण परिस्थितीत कोरोना माहामारीशी झुंज देत असतांना कर्जासाठी शासनाच्या व रिझर्व्ह बँकेच्या सुचना व आदेश डावलून सामान्य नागरिक कर्जदाराची पिळवणूक करून कर्जाचे हप्ते व दंडाची रक्कम वसूल करणार्या वित्तीय संस्थावर, फायनान्स, मोटार व्हेईकल फायनान्स व बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या कर्जदाराची वसुली करण्यासाठी तगादा लावणार्या वित्तीय संस्था यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
अनेक गरीब व मध्यमवर्गीय जनतेस बँका मदत करत नसल्याने, छोटा व्यवसाय सुरु करण्यासाठी ते मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतात व परतफेड देखील करत आसतात मात्र लॉकडाउन मुळे सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. याकाळात शासनाने कर्ज वसूलीस स्थगिती दिली होती. मात्र आता लॉकडाउन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर लगेच अनेक मायक्रो फायनान्स व मोटार व्हेईकल फायनान्स कंपन्यांनी वसूलीचा तगादा सुरु केला आहे, बजाज फायनान्स, मनिपुरम फायनान्स, टाटा मोटार फायनान्स इत्यादी फायनान्स कंपनी तगादा लावलेला आहे, रोजगार सुरळीत झालेच नाहीत. तेव्हा कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याने गरिब जनतेस प्रंचड मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.
यामुळे व्यवहार सुरळीत होईपर्यंत मायक्रो फायनान्स व मोटार विकल लोन फायनान्स कंपनीच्या वसूलीस शासन स्तरावर स्थगिती देण्यात यावी .लॉकडाउन दरम्यान बेरोजगार व निराधार झालेल्या जनतेला प्रचंड मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याने मायक्रो फायनान्स कंपनीच्या व मोटार फायनान्स कंपनी सक्त वसूलीला स्थगिती देण्यासंदर्भात व त्यांच्यावर गुन्हे नोंद ज्ञात यावे अशी शासनदरबारी निर्णय व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे, नांदेड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष राहुल जाधव व उपाध्यक्ष बच्चू यादव यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.