*लातूर विभागाचे दहावी – बारावीच्या उत्तरपत्रीका तपासणीचे काम अंतीम टप्यात* दहावी -बारावीचे 2 लाख विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – लातूर – विशेष प्रतिनिधी : जीवन भोसले – माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षन मंडळाच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या लातुर विभागातील 91हजार 584 विद्यार्थींच्या उत्तरपत्रीका तपासणीचे काम पुर्ण झाले असून , दहावीचे काम दोन दिवसात पुर्ण होईल , असे मंडळाच्या सुत्रांनी सांगितले.

बारावी परिक्षेसाठी लातूर विभागीय शिक्षण मंडळाकडे 91हजार 584 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. लातुर विभागात नादेड, उस्मानाबाद, आणि लातूर या तिन जील्ह्यांचा समावेश होतो . या मध्ये कला शाखेतील 36 हजार 530, वाणिज्य 11हजार 822, सायंन्स 38 हजार 219, तर एमसिव्हीसी शाखेच्या 5 हजार 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील 36 हजार 445, उस्मानाबाद 16 हजार 418, नांदेड जिल्ह्यात 38 हजार 721, विद्यार्थ्यांनी बारावी ची परिक्षा दिली होती . सर्व विषयांच्या उत्तरपत्रीका तपासणीचे काम पुर्ण झाले आसून मंडळाकडून पुढील कार्यवाही केली जात आहे . तसेच दहावी साठी जिल्ह्यातील 43 हजार 1, उस्मानाबाद, 24 हजार 515, तर नांदेड जिल्ह्यात 50 हजार 742, अशा एकूण 1लाख 18 हजार 288 विद्यार्थ्यांची नोंदणी होती .

लाँकडाऊन मुळे दहावी वर्गाचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता, अनेक शिक्षकांना लॉकडाऊन काळात उत्तरपत्रीका तपासणीसाठी मिळाल्या नव्हत्या . त्या मुळे दहाविच्या उत्तरपत्रीका तपासणीचे काम मंदावले होते , शिथिलता मिळताच शिक्षकांना मुख्याद्यापकांमार्फत उत्तरपत्रीका पोहच करण्यात आल्या,

लातूर मंडळातील दहावीच्या उत्तरपत्रीका तपासनीचे काम पुर्ण झाले असून , संकलनाचे काम 98 टक्के पुर्ण झाल आहे . दोन दिवसात उर्वरित काम होनार असल्याचे लातुर विभागीय शिक्षन मंडळांचे सचिव तथा शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी सांगीतले, दहावी आणि बारावी अशा दोन वर्गातील जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे . त्यामुळे सर्वांनांच निकालाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रात उत्तरपत्रीका तपासणी आणि संकलनात लातूर विभागीय शिक्षन मंडळ आघाडीवर आहे .
दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भातील कामे लवकरच पुर्ण केले जानार असल्याचे सुत्रांनी सांगीतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *