महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । सध्या अमेरिका (America) देशात प्रचंड गर्मी आहे. त्यामुळे तिथल्या सरकारने (Heat wave in America) एक टोकाचा निर्णय घेतला आहे. काही शहरात ‘हीट स्ट्रोक लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला आहे. कोलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा (California, Texas, Florida, Heat wave) या शहरात अधिक उष्णता आहे. लोकांनी दिवसा घराबाहेर पडायचं बंद केलं आहे. तापमान 43 डिग्री सेल्सियसच्या पुढे गेले आहेत. कोलिफोर्निया शहरात परिस्थिती अधिक बिकट आहे. रविवारी तापमान 54 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेत काही शहरात घरातून बाहेर निघाल्यानंतर भाजून निघल्यासारखं वाटतं आहे. अनेक शहरांमध्ये ‘हीट स्ट्रोक लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला आहे.
असा असेल ‘हीट स्ट्रोक लॉकडाऊन’
लोकांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत घरातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. 10 करोड लोकांना उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोलिफोर्नियाच्या डेथ वैलीमध्ये याच्या आगोदर सुध्दा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. फीनिक्समध्ये तापमानाचा पारा 47-48 डिग्रीच्या आसपास आहे. त्या शहरात रात्री सुध्दा गर्मी आहे. रात्रीचं तापमान 32-33 डिग्री सेल्सियस असते.
रविवारी तापमान 54 अंश सेल्सिअसच्या पुढे
तिथल्या हवामान खात्याकडून कोलिफोर्निया शहरातील डेथ वैली भागात रविवार तापमान 54 डिग्री सेल्सियस पुढे जाण्याची शक्यता आहे. जगात सगळ्यात जास्त तापमान होणार असल्याने त्याचा रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचं तापमान काहीवेळा पाहायला मिळालं आहे. 2020 मध्ये सुध्दा तिथं तपमान 54 डिग्रीच्या जवळपास पोहोचलं होतं. कृपया सांगा की सर्वकालीन जागतिक रेकॉर्ड 56 अंश सेल्सिअसचा आहे. 1931 मध्ये ट्यूनीशियामध्ये 55 डिग्री तापमानाची नोंद झाली होती.