महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – चिखली-जाधववाडी येथील उद्योजक अॅड. विशाल भाऊ जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर लिगल सेल च्या भोसरी विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे……… राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर चे अध्यक्ष माननीय संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते निवडीचे प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले. सदर प्रसंगी लिगल सेल चे शहराध्यक्ष श्री.गोरक्ष लोखंडे , विरोधी पक्षनेते श्री. नानासाहेब काटे, शहराध्यक्षा वैशाली ताई काळभोर, कार्याध्यक्ष श्री.प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा ताई जगताप ,विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष सुनील भाऊ गव्हाणे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराचे अध्यक्ष श्री. वाघेरे पाटील यांनी नव निर्वाचीत भोसरी विधानसभा अध्यक्ष अॅड. विशाल भाऊ जाधव यांना निवडीचे प्रमाण पत्र प्रदान करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व श्री विशाल जाधव हे पक्ष वाढी साठी, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी व चांगल्या प्रकारे कार्य करतील असा विश्वास व्यक्त केला.