बुलडाणा क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याकरीता 20 जूनपर्यंत मुदत वाढ  माध्यमिक/उच्च माध्यमिक परिक्षेत प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांसाठी सवलत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलडाणा – ता. १७ माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या/ सहभागी झालेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात शासन निर्णयान्वये कळविण्यातआले आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यातआला आहे. या शासन निर्णयान्वये, राज्यात उद्भवलेल्या कोवीड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य

परिस्थितीमुळे व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता कोणताही संबंधीत खेळाडू क्रीडा गुण सवलतीपासुन वंचीत राहु नये, याउदात्त हेतुने क्रीडा गुण सवलतीचे परिपुर्ण प्रस्ताव द्वि-प्रतीत, शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्ययांनी 20 जून 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेकडे सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *