महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आजी माजी पदाधिकारी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ जुलै २०२३ रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी या शिबारचे आयोजन सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत करण्यात आले आहे . तरी या कार्यक्रमाप्रसंगी विनायक राऊत खासदार , सचिन आहिर आमदार , रवींद्र मिर्लेकर समन्वयक नेते, तसेच शहरातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
या रक्तदान शिबिरास रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहरप्रमुख सचिन भोसले यांनी केले आहे . १०० लोकांना एकावेळी रक्तदान करता येईल अशी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहे . तसेच २०२३ रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे असे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले .