महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । निगडी येथील अमरधाम स्मशान भूमी येथील धूर अंत्यविधी करण्यात येत असताना फोवोर बसविण्यात आला असून तो निष्क्रिय ठरला आहे अंत्यविधी करताना धूर फोवोर मधून बाहेर निघावा लागतो पण फोवोर मधून धूर बाहेर पडतं नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी लाखो रुपये खर्च करून निगडी येथील अमरधाम स्मशान भूमी ह्या ठिकाणी अंत्यविधी करताना धूर बाहेर निघावा म्हणून फोवोर बसविण्यात आला होता प्रदूषण नियंत्रण राहावे हा हेतू होता पण फोवोर निष्क्रिय झाला आहे .
निगडी अमरधाम स्मशान भूमी ह्या ठिकाणी गवत वाढले असून सीमा भिंतीच्या बाजुला कचरा विल्हेवाट होत नाही तसेच अंत्यविधी करण्यात येत आहे तेथील लोखंडी शेड पत्रे फुटलेल्या अवस्थेत आहेत अमरधाम स्मशानभूमी कमानी वरील संत तुकाराम पुतळा खराब झालेल्या अवस्थेत आहे याची दखल घेण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्या कडे सचिन काळभोर यांनी केली आहे.