साप्ताहिक राशीफल – या आठवडय़ात कोणत्या राशीला काय फळ ; पहा राशिभविष्य ; रविवार 23 जुलै ते शनिवार 29 जुलै 2023

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै ।

मेष – संभ्रम निर्माण होतील

मेष राशी या आठवडय़ात प्रत्येक ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. धावपळ, दगदग जपून करा. नोकरीच्या कामात कायदा पाळा. धंद्यात वाढ झाली तरी भागीदाराला जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणी निर्माण होतील. संभ्रम निर्माण होतील.

वृषभ – व्यवहारात कायदा पाळा.

वृषभेच्या सुखस्थानात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. क्षुल्लक वाद, गैरसमज याकडे लक्ष न देता कामाकडे लक्ष द्या. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात किरकोळ अडचणी येतील. मोह टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मर्जीनुसार कामे करावी लागतील. चुकीच्या व्यक्तीसोबत राहू नका. व्यवहारात कायदा पाळा.

मिथुन – प्रतिष्ठा लाभेल.

मिथुनेच्या पराक्रमात बुध, सूर्य, बुध, शुक्र युती. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अडचणी कमी होऊन योग्य दिशेने वाटचाल कराल. अधिकार, प्रतिष्ठा लाभेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय फायदेशीर ठरेल. यश मिळेल. कुटुंबातील समस्या कमी होतील.

कर्क – लोकप्रियता वाढेल.

कर्केच्या धनेषात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. महत्त्वाची कठीण कामे करून घ्या. आठवडा यशस्वी ठरेल. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे प्रगती कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर होतील. योजना पूर्ण करा. लोकप्रियता वाढेल. घरासंबंधी कामे करा. खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होईल.

सिंह – स्पर्धेत जिद्द बाळगा.

स्वराशीत बुध, बुध नेपच्युन षडाष्टक योग. अहंकारयुक्त वक्तव्य कोणत्याही क्षेत्रात उपयुक्त ठरणार नाही. नोकरीच्या कामात सावध रहा. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या विरोधात जाणे अयोग्य ठरेल. स्पर्धेत जिद्द बाळगा. नविन परिचय उत्साह, आत्मविश्वास देणारा ठरेल.

कन्या – समाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

कन्येच्या व्ययेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. थट्टामस्करी करताना प्रसंगावधान ठेवा. मैत्रीत गैरसमज होतील. खर्च वाढेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. धंद्यातील व्यवहार घाईत करू नका. राजकीय, समाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. विरोधी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. संसारात तणाव जाणवेल.

तूळ – धंद्याला चालना मिळेल.

तुळेच्या एकादशात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. आठवडय़ाच्या सुरूवातीला क्षुल्लक अडचणी येतील. नोकरीत प्रभाव पडेल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार प्राप्ती होईल. नविन परिचय प्रेरणादायक ठरतील. लोकप्रियता वाढेल. धंद्याला चालना मिळेल. योजना पूर्ण करा.

वृश्चिक – स्पर्धेत यश मिळेन.

वृश्चिकेच्या दशमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे पूर्ण करता येतील. धंद्यात प्रगती होईल. चर्चेत यश मिळेल. वसुली करा. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका. प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत यश मिळेन.

धनु – प्रतिष्ठा जपा.

धनुच्या भाग्येषात बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. मनाविरुद्ध घटना घडल्यातरी विचलीत होऊ नका. अहंकार दूर ठेवा. मैत्री, प्रेमळ बोलणे यावर यश टिकवता येईल. कामात चूक टाळा. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होईल. प्रतिष्ठा जपा. रागावर ताबा ठेवा. नविन ओळख उत्साहवर्धक ठरेल.

मकर – मनस्ताप होईल.

मकरेच्या अष्टमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. जवळच्या व्यक्ती तुमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील. मैत्री, नाते जपा. कठोर शब्द वापरू नका. धंद्यात नुकसान टाळा. मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मनस्ताप होईल. दौऱयात काळजी घ्या. खाण्यापिण्यात अतिरेक नको.

कुंभ – कामात चूक टाळा.

कुंभेच्य सप्तमेषात बुध, सूर्य, शनि षडाष्टक योग. क्षेत्र कोणतेही असो अधिकारी थाटात वागणे त्रासदायक ठरेल. तुमचे मत गोड शब्दांत मांडा. नोकरीच्या कामात चूक टाळा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक परिचय वाढतील. प्रतिष्ठेचा प्रश्न न करता योजनांना न्याय द्या. वृद्धांना जपावे लागेल.

मीन – आरोग्याची काळजी घ्या.

मीनेच्या षष्ठेशात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. कठोर शब्द वापरणे अयोग्य ठरेल. मोह टाळा. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात हिशेबात चुकू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांना, सहकारी नेते यांना दुखवू नका. कामे होतील. प्रतिष्ठा वाढेल. पद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. तणाव होतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *