चायना’ फोन नको, मग हे आहेत दमदार पर्याय

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. १८ – 1. सॅमसंग दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग स्मार्टफोनच्या बाजारातील मोठी कंपनी आहे. सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोनला हिंदुस्थानमध्ये मोठी मागणी असते, त्यामुळे वेगवेगळ्या फीचर्ससह आपल्याला चांगला फोन मिळू शकतो. फ्लॅगशिप फोन ते बजेट फोन असा पर्याय तुमच्याकडे आहे.

2. ऍपल
जगभरात आयफोन बनवणारी सर्वात मोठी कंपनी ऍपल असून ही कंपनी कॅलिफोर्नियाची आहे. तुम्हाला जर प्रीमियम डिव्हाईस खरेदी करायचा असेल तर ऍपल हा चांगला पर्याय आहे. ऍपलने नुकताच सर्वसामान्य लोकांना परवडेल असा iPhone SE देखील लॉन्च केला आहे.

3. नोकिया
एकेकाळी संपूर्ण मार्केटवर कब्जा केलेली नोकिया कंपनी मध्यंतरी स्पर्धेतून बाहेर फेकले गेली होती, मात्र आता नोकियाने स्मार्टफोनच्या बाजारात पुन्हा पुनरागमन केले आहे. नोकिया ही कंपनी फिनलँडची आहे. दमदार आणि टिकाऊ फोनबाबत नोकियाचा हात कोणी धरू शकत नाही.

4. मोटोरोला
मोटोरोला ही अमेरिकन कंपनी असून जवळपास सर्वच प्राईज संगमेंटमध्ये स्मार्टफोन लॉन्च करते. कंपनीने नुकतीच नवीन फ्लॅगशिप सिरीज हिंदुस्थानच्या बाजारात लॉन्च केली आहे. यासह मध्यम किमतीचे आणि बजेट फोनही मोटोरोला कंपनी उपलब्ध करून देते.

5. आसूस
आसूस ही तैवानची कंपनी असून चिनसोबत त्यांचे लागून आहे. या कंपनीने हिंदुस्थानमध्ये अनेक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. पॉवरफुल बॅटरी असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमतही खिशाला परवडणारी आहे.

6. गूगल
प्रीमियम सेगमेंटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर गूगलचे फोन सर्वोत्तम आहेत. ही एक अमेरिकन कंपनी असून अनेक चांगले स्मार्टफोन हिंदुस्थानच्या बाजारात उतरवले आहेत.

7. एलजी
एलजी ही दक्षिण कोरियन कंपनी असून याचे विविध उत्पादन हिंदुस्थानमध्ये विकले जातात. कंपनीने ड्युल स्क्रीनसह फ्लॅगशिप ThinQ डिव्हाईस हिंदुस्थान मध्ये लॉन्च केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link