महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत एमआय न्यूयॉर्क संघाकडून खेळताना कायरन पोलार्डने स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारला आहे.
एमआय न्यूयॉर्क आणि सिएटल ओकार्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कायरन पोलार्डने तब्बल ११० मीटर लांब षटकार मारल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
Kieron Pollard hit the biggest six in MLC.
110 meters by MI New York Captain.pic.twitter.com/OVY5wI7KM0
— Johns. (@CricCrazyJohns) July 26, 2023
एमआय न्यूयॉर्क संघाचा कर्णधार कायरन पोलार्डने १२ व्या षटकात कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत असताना गगनचुंबी षटकार मारला. कॅमेरून ग्रीनने शॉर्ट पिच चेंडू टाकला ज्यावर पोलार्डने जोरदार बॅट फिरवली.
हा चेंडू इतक्या लांब गेला की मैदान छोटं पडलं. या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. या डावात फलंदाजी करताना त्याने १८ चेंडूंचा सामना करत ३४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर एमआय न्यूयॉर्क संघाने २० षटकअखेर ८ गडी बाद १९४ धावा केल्या होत्या. (Kieron Pollard Six Video)
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी धुमाकुळ घालणारा पोलार्ड आता अमेरिकेतही धुमाकुळ घालताना दिसुन येत आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहुन असं वाटत होतं की, तो मोठी खेळी करणार. मात्र त्याचा डाव ३४ धावांवर संपुष्टात आला. त्याने केवळ १८ चेंडूंचा सामना करत ही खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ गगनचुंबी षटकार मारले. (Latest sports updates)
तर आक्रमक फलंदाज निकोलस पुरनने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली.मात्र ही खेळी व्यर्थ गेली कारण १९५ धावांचा पाठलाग करताना सिएटल ओकार्स संघाने जोरदार विजय मिळवला. सिएटल ओकार्स संघाकडून नाबाद शतकी खेळी करणारा हेनरीक क्लासेन विजयाचा हिरो ठरला.