महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -विशेष प्रतिनिधी- अजय सिंग – नवीदिल्ली : लवकरच एटीएममधून ५ हजार पेक्षा अधिक रक्कम काढली तर कदाचित तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. यासंदर्भात एक अहवाल RBIला देण्यात आला असून त्यावर विचार सुरू आहे.येत्या काही दिवसात जर तुम्ही ATM मधून पाच हजारहून अधिक पैसे काढला तर त्यासाठी चार्ज द्यावा लागेल. एटीएममधून काढण्यात येणाऱ्या इतक्या रक्कमेवर चार्ज लावण्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विचार करत आहे. RTI अर्थात माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार डिजिटल व्यवहारांना (Digital transactions) प्रोत्साहन देण्यासाठी आणि पैसे काढण्याची सवय कमी करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक अशा पद्धतीने अतिरिक्त चार्ज लावण्याचा विचार करत आहे.
RTI च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन बँक असोशिएशनचे (India Banks Association) मुख्य एक्जिक्युटिव्ह व्हीजी कन्नन यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती नेमली होती. ही समिती एटीएम मधून पैसे काढण्याची सवय कमी कशी करता येईल यावर अहवाल सादर करणार होती. समितीने त्यांचा अहवाल २२ ऑक्टोबर २०१९ रोजी रिझर्व्ह बँकेला सोपवला होता. अर्थात हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला नव्हता.
मिंट या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार आरटीआय कार्यकर्ते श्रीकांत एल यांनी यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. श्रीकांत यांचा अर्ज आरबीआयच्या पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर ( POI)ने तो फेटाळून लावला. त्यानंतर श्रीकांत यांनी तो अर्ज बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. अखेर त्यांनी संबंधित अहवालाची प्रत्र मिळाली. हा अहवाल श्रीकांत यांनी सार्वजनिक डोमेनवर प्रसिद्ध केला.
या अहवालानुसार एटीएम केंद्राचा ऑपरेशनल कॉस्ट खुप वाढला आहे. त्या शिवाय इंटरचेंज शुल्क आणि एटीएम वापराचे चार्जचे मुल्यांकन २०१२ आणि २००८ नंतर झाले नाही. सेमी अर्बन आणि ग्रामीण भागात एटीएमची संख्या अतिशय कमी आहे. या भागात एटीएमची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.