महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । पिंपरी : आले- लसणाची फोडणी दिल्याशिवाय कोणतीही भाजी- आमटी चविष्ट होत नाही; मात्र सध्या आले, लसूण, टोमॅटोचे दर गगनाला भिडले असल्याने गृहिणींसाठी भाजीला फोडणी देणे आता थोडे महागाचे ठरत आहे; परंतु पालेभाज्या, काकडी आणि लिंबाचे दर घटले आहेत. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये किरकोळ बाजारात कोथिंबीर, पालक, मेथीची जुडीची दहा रूपयाला विक्री होत आहे. आले- लसणाचे दरही वाढले आहेत. अधिक, तर टोमॅटोने पार केलेली शंभरी अद्यापही कायम आहे. मटार तीनशे रूपये, शिमला 100 ते 110 रूपये प्रतिकिलो विक्री होत आहे. फ्लॉवर, भेंडी 60 रूपये तर काकडी 30 ते 40 रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
मोशी उपबाजारातील आवक (क्विंटलमध्ये)
लसूण 60, आले 61, टोमॅटो 175, हिरवी मिरची 89, कोबी 229, कांदा 268, बटाटा 833, भेंडी 81, कारली 19, शेवगा 16 क्विंटल आवक झाली आहे.
घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर आले 100 ते 110, लसूण 90 ते 100, हिरवी मिरची 40 ते 45, कोबी 15 ते 20, टोमॅटो 70 ते 80, कांदा 8 ते 9, बटाटा 10 ते 12, भेंडी 20 ते 25, मटार 90 रूपये दराने विक्री होत आहे.
मोशी उपबाजारात पालेभाज्यांची 65700 गड्डींची आवक झाली आहे. फळे 265 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2915 क्विंटल एवढी झाली आहे.
शिमला मिरची भडकली
शिमला मिरचीची आवक परराज्यामधून होत असल्याने दरात वाढ झाली आहे. पावसामुळे मिरची खराब होत असल्याने या भाजीची नाजूक पध्द्तीने हाताळणी करावी लागत आहे. मिरचीचा माल बाहेरून येत असल्याने वाहतूक खर्चामुळे दरात वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
लिंबू दहा रुपयाला दहा, तर काकडी 30 रुपये किलो
लिंबाच्या दरात मोठी घट झाली आहे. उन्हाळ्यामध्ये दहा रूपयाला दोन लिंबांची विक्री होत होती; मात्र आता दहा रूपयाला दहा लिंबू मिळत आहेत. तर काकडीची देखील प्रतिकिलो 30 रूपयाने विक्री होत आहे.
पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रति पेंडी)
मेथी 10 ते 15
कोथिंबीर 5 ते 10
कांदापात 10
शेपू 10
पुदिना 5
मुळा 10
चुका 10
पालक 10 ते 15
फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 30 ते 35
बटाटा 30
आले 220
भेंडी 60
टामॅटो 120 ते 130
सुरती गवार 80 ते 90
गावरान गवार 120 ते 130
दोडका 70
दुधी भोपळा 70
लाल भोपळा 60 ते 70
कारली 70
वांगी 60
भरीताची वांगी 70
तोंडली 50
पडवळ 100
फ्लॉवर 60
कोबी 50 ते 60
लसूण 220
काकडी 30 ते 40
शिमला 100 ते 110
शेवगा 90
हिरवी मिरची 80 ते 90