Medicine QR Code Scan : आजपासून या ३०० औषधांवर QR Code अनिवार्य, सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । बनावट औषधांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे गोळ्या विकत घेताना अनेकांच्या मनात याची भिती असते. पण आता यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने देशातील ३०० फार्मा ब्रँडसाठी QR कोड किंवा बारकोड ठेवणे अनिवार्य केलं आहे. आता १ ऑगस्टला किंवा त्यानंतर बनवलेल्या औषधांसाठी हे बंधनकारक असणार आहे. ज्या औषधांवर क्यूआर कोड अनिवार्य करण्यात आले आहेत त्यामध्ये कॅल्पोल, डोलो, सॅरिडॉन, कॉम्बीफ्लम आणि अँटीबायोटिक्स अजिथ्रल, ऑगमेंटिन, सेफ्टम, मेफ्टेल ते ऍलर्जी-विरोधी औषधं अॅलेग्रा आणि थायरॉईड औषध थायरोनॉर्म यांचा समावेश असणार आहे.

स्मार्टफोन क्लिअरन्स स्टोअर, 6299 रुपयांपासून सुरू
QR कोडमुळे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करणं सोपे होईल. यामुळे बॅच रिकॉल आणि बनावट औषधे ओळखण्यात देखील मदत होईल. या निर्णयामुळे देशातील निकृष्ट किंवा बनावट औषधांच्या विक्रीला आळा घालण्यास मदत होईल, असं औषध उद्योगातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. औषधांवर क्यूआर कोड टाकण्याच्या सूचना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आल्या होत्या. त्यात म्हटले आहे की शेड्यूल H2 मध्ये येणार्‍या औषधांना प्राथमिक पॅकेजिंग लेबलवर बार कोड किंवा सेकंडरी पॅकेज लेबल चिकटवावे लागेल.

QR कोडमध्ये कोणती माहिती असेल?
QR कोडचा संग्रहित डेटा किंवा माहितीमध्ये उत्पादनाची ओळख कोड, औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँड नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, मॅनिफॅक्चरिंग तारीख) आणि उत्पादन परवाना क्रमांक यांचा समावेश असणार आहे.

सर्व कंपन्यांना QR कोड बसवावा लागणार…
या ३०० औषधांचे फॉर्म्युलेशन ब्रँड तयार करणाऱ्या सर्व देशी आणि विदेशी कंपन्यांना त्यांच्या औषधांवर QR कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या कंपनीला हवे असल्यास, ती स्वतःच कोणत्याही ब्रँडसाठी बार कोड किंवा QR कोड लागू करू शकते किंवा प्रिंट करू शकते.

NPPA ने औषधे ओळखली
मार्च २०२२ मध्ये, आरोग्य मंत्रालयाने फार्मास्युटिकल्स विभागाला ३०० ड्रग ब्रँड्सची शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले होते. जे अनिवार्य QR कोडच्या अंमलबजावणीसाठी निवडले जातील. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने ३०० औषधांची यादी तयार केली होती. NPPA ने Dolo, Allegra, Asthalin, Augmentin, Saridon, Limsey, Calpol, Corex, Thyronorm, Unwanted 72 सारखे लोकप्रिय ब्रँडची यामध्ये निवड केली. हे सर्वाधिक विकले जाणारे ब्रँड त्यांच्या मूव्हिंग अॅन्युअल टर्नओव्हर (MAT) मूल्याच्या आधारावर शॉर्टलिस्ट केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *