श्रीमंती : देशातील 4001 आमदारांकडे तब्बल इतके कोटी रुपयांची संपत्ती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । देशातील सुमारे ४ हजार आमदारांकडे एकूण ५४,५४५ कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या २०२३-२४ च्या एकूण बजेटपेक्षा ही जास्त आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३.६३ कोटी रुपये आहे. एडीएआर या स्वयंसेवी संस्थेने २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ४०३३ पैकी ४००१ आमदारांच्या निवडणूकपूर्व शपथपत्रांच्या आधारे संपत्तीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे.

हे आमदार ८४ राजकीय पक्षांचे असून त्यात अपक्षांचाही समावेश आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे १,४१३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. अपक्ष ९५ आमदारांकडे एकूण २,८४५ कोटी रुपये आहेत. भाजपच्या १,३५६ आमदारांची संपत्ती १६,२३४ कोटी आणि काँग्रेसच्या ७१९ आमदारांची संपत्ती १५,७९८ कोटी आहे. एकूण संपत्तीमध्ये या दोन प्रमुख पक्षांच्या आमदारांचा एकूण वाटा ५८.७३% आहे.

२९.९४ कोटी रुपये अपक्ष आमदारांची सरासरी मालमत्ता

१३.६३ कोटी रु. आमदारांची सरासरी मालमत्ता

२३.१४ कोटी सर्वात श्रीमंत वायएसआर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *