August Month Holiday : ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचा पाऊस ; सरकारी कामे असल्यास उरकून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । List of Bank Holidays in August 2023 : नवा महिना सुरु झाला की, आपण सर्वात आधी शोधतो ते सुट्ट्या. यंदा ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याचा पाऊस पडला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यंदा ऑगस्ट महिना सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सुट्ट्यांचा महिना आहे. या महिन्यात आपण फिरण्यासाठी अनेक नवीन प्लान करु शकतो. ऑगस्ट महिन्यात सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँका १४ दिवस बंद राहातील. त्यामुळे बँका कमी दिवस सुरु राहातील. मात्र या १४ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये ४ रविवार व २ शनिवार यांचा समावेश आहे. यामध्ये ग्राहक ऑनलाइन बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो.


1. सुट्ट्या कशा असतील?
या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १२, १३, १५ आणि १६ ऑगस्ट (August) रोजी सुट्ट्या आहेत. या सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांना त्यांची कामे वेळेतच (Time) करावी लागणार आहेत. या महिन्यात ६ ऑगस्ट, १३ २० आणि २७ ऑगस्ट या दिवशी रविवारची सुटी आहे. १२ आणि २६ ऑगस्टला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुटी आहे. १२ ऑगस्टच्या दुसऱ्या शनिवारनंतर १३ रोजी रविवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि १६ ऑगस्टला पारशी नूतन वर्षाची सुटी आहे. १४ ऑगस्टची रजा घेणाऱ्यांना सलग ५ दिवस सुट्ट्या मिळतील.

2. सरकारी कामे लगेच करा
जर तुम्हाला बँकांशी (Bank) किंवा इतर सरकारी कामे लवकर करायची असल्यास तुम्ही या किंवा पुढच्या आठवड्यात करु शकतात. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या अडचणी देखील कमी होतील व तुमची अनेक कामे लवकर मार्गी लागतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *